Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

वार्षिक अर्थसंकल्प: Part 2

आर्थिक पाहणी अहवाल प्रातिनिधिक चित्र. पहिल्या भागात वार्षिक अर्थसंकल्प, त्यासंबंधी असणाऱ्या घटनात्मक तरतुदी, पायंडे, संकेत याचा थोडक्यात आढावा घेतला. वार्षिक अर्थसंकल्प मांडला जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री एक महत्त्वपूर्ण ऐवज संसदेच्या पटलावर ठेवतात, त्यासंबंधीची चर्चा या भाग २ मध्ये. तो म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल...  भारताच्या केंद्रीय वित्त मंत्रालयात विविध विभाग आहेत. आर्थिक व्यवहार विभाग (Economic Affairs), वित्तीय सेवा (Financial Services), गुंतवणूक प्रचार, साहाय्य आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (Investment & Public Asset Management), राजस्व (Revenue), आणि सार्वजनिक उद्योग हे ते विभाग होय. केंद्रीय वित्त मंत्री या मंत्रालयाच्या प्रमुख आहेत तर त्यांच्या सोबत दोन केंद्रीय वित्त राज्यमंत्री आहेत. त्या त्या विभागाचे नेतृत्व करणारे सचिव असतात आणि त्या सर्वांवर देखरेख/नियंत्रण राखणारे असतात ते केंद्रीय वित्त सचिव. या सर्वांच्या जोडीला एक महत्त्वपूर्ण पद/अधिकारी असतात ते मुख्य आर्थिक सल्लागार.  मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) हे आर्थिक व्यवहार विभाग, भारत...

वार्षिक अर्थसंकल्प: Part 1

  अर्थमंत्री २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी.  १ फेब्रुवारी जवळ येऊ लागतो तसे आता अर्थसंकल्पाचे वेध लागतात . पूर्वी ते २८ फेब्रुवारी येतायेता लागत असत . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने हा प्रघात बदलून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली . ती का केली , त्याचे काय परिणाम इत्यादी विषय अनेक वेळा चर्चेला येऊन गेले आहेत . गेल्या ५ हुन अधिक वर्षांत त्याचे लाभही दिसून आले आहेत . तरीही उजळणी स्वरूपात चर्चा केली जाणार आहे . अर्थसंकल्प येण्यापूर्वी या देशाचा अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित विविध घटकांची चर्चा करण्याचा इथे प्रयत्न आहे . प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे . घटनात्मक तरतुदी दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात समस्त भारत अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला असतो . अर्थसंकल्पात काय मांडणी आहे यावर देश वर्षभरात कसा वाटचाल करणार आहे हे निश्चित होत असते , तसेच गेल्या वर्षभराचा आढावा देखील त्यात असतो . भारतीय संविधानाच्या भाग ५ मध्ये केंद्र स...

मंदिर: आर्थिक उलाढालीचे केंद्र

श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचंद्रचरणौ शरणम् प्रपद्ये। अयोध्या श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. अवघा भारत राममय झाला आहे. अनेक शतकांची प्रतीक्षा, कारसेवा, अनेकांचे बलिदान यांचे परिणाम स्वरुप हे मंदिर उभे राहत आहे, यामुळे सामान्यजन आनंदी आहे, समाधानी आहे. विरोध करणारे आहेतच. ते विरोध करतच राहणार.  मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे अशा शब्दांत खिल्ली उडवताना आक्षेप घेतले जायचे की मंदिर बांधल्याने रोजगार मिळणार आहेत का? लोकांचे जीवनमान सुधारणार आहे का? लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत का? असले प्रश्न उपस्थित केले जातात. मंदिर बांधण्याऐवजी शाळा, हॉस्पिटल बांधा वगैरे शहाणपणाचे सल्ले देखील दिले गेले, अजूनही दिले जात आहेत. या सगळ्यामागे हिंदू मताचा, हिंदू धर्माचा आकस हे एक कारण आहेच त्याशिवाय मंदिर आणि अर्थकारण या विषयाचे अज्ञान किंवा दुर्लक्ष हेदेखील एक कारण आहे. याच अनुषंगाने मंदिर आणि अर्थकारण या विषयाचा हा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.  प्राचीन काळापासून भारतीय मंदिर...

राम मंदिर: राम विचार, राम विधान

उदंड जाहले पाणी  स्नानसंध्या करावया  जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी।। बुडाली सर्वही पापे हिंदुस्थान बळावले  अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी।। साक्षेपी लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात म्हणतात, "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, हे पाणी उदंड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही तीरांवर हिंदूंचे राज्य असेल नाही तर तेच पाणी उडी मारून आत्महत्या करण्याच्या योग्य ठरते"  आज अयोध्येत श्रीरामलला विराजमानची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामरायाकडे क्षमायाचना केली. आमच्या पुरुषार्थात, एकीत, क्षात्रतेजात काही कमतरता होती म्हणून हे श्रीराममंदीर होण्यास इतका विलंब झाला. पण आता श्रीराम विराजमान झाले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आहे, आणि श्रीराम नक्कीच आपल्याला क्षमा करतील.  आजचा दिवस हा शरयू-गंगा-भागीरथीचे पाणी उदंड करणारा आहे. नर्मदा, सिंधू, गौतमी, कावेरी, वाशिष्ठी, कृष्णा, ब्रह्मपुत्र, महानदीचे पाणी उदंड करणारा आहे. हा क्षण आपण सर्वानी याची देही याची डोळा अनुभवला! धन्य झालो.   हा अभूतपूर्व क्षण अनुभवत असतानाच अनेक विचार अ...

आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग: अपूर्वा जोशी

फॉरेन्सिक, हा शब्द ऐकल्यानंतर डोळ्यासमोर एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी ब्युरोतील डॉ. साळुंखे येतात. चित्रविचित्र रंगांची रसायने, बर्नर, वगैरे येत असत. कारण एक पिढी तो कार्यक्रम पाहत मोठी झाली आहे. पुढली पिढी थोडा अधिक वास्तववादी वाटावा असा क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम पाहत मोठी होत आहे. त्यात बोटांचे ठसे, रक्ताचे डाग वगैरे शोधणारी अगदी सामान्य दिसणारी माणसे आहेत. पण फॉरेन्सिक म्हणजे भारतीय दंड संहितेतील खून, दरोडा, सदोष मनुष्यवध वगैरेच समोर येते. या रूढार्थाने प्रसिद्ध गुन्ह्यांच्या जोडीला आर्थिक आणि आता सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. मग या आर्थिक गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो? तिथे कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान, प्रणाली वापरली जाते? त्याचे नाव फॉरेन्सिक अकाउंटिंग!  वर्ष २००९ मध्ये गाजलेल्या सत्यम कॉम्प्युटर्स च्या घोटाळ्यात देशात प्रथमच या ज्ञान शाखेचा उपयोग केला गेला. तो घोटाळा नेमका काय आहे, गफलत नेमकी कुठे आहे हे शोधून काढण्यात पुण्यातील फॉरेन्सिक अकाउंटिंग एक्स्पर्ट श्री मयूर जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचीच चित्तथरारक कथा, मयूर जोशी यांची स...