Posts

भारतीय अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती

Image
Pic credit: Internet  कुठलीही व्यवस्था ही दोन प्रमुख घटकांवर आधारित असते. एक म्हणजे व्यवस्था उभारणीमागील प्रेरक शक्ती आणि दोन, मार्गदर्शक शक्ती. हाच निकष अर्थव्यवस्थेस देखील लागू पडतो. जगाच्या पाठीवर अनेक प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत, प्रत्येकाची आपली अशी प्रेरक आणि मार्गदर्शक शक्ती आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था भांडवलशाहीचा पुरस्कार करते, उद्यमी धाडसीपणला प्रोत्साहन देते त्याचे कारण प्रेरणा व्यक्तीस्वातंत्र्याची आहे, Life, Liberty,  and Pursuit of Happiness ची आहे.  जपान देखील चिवटपणा, उद्यमी प्रेरणांच्या आधारे जगात महत्वाच्या स्थानी आहे. ब्रिटिशांना दर्यावर्दी साहसाची प्रेरणा आहे.  चीन हा स्वतःला अभिमानाने Civilisational State म्हणवून घेतो. कम्युनिस्ट विचारधारा आणि हजारो वर्षांचा स्वाभिमानी इतिहास यांची अफलातून सांगड घालत त्यातून प्रेरणा घेत चीन आज जागतिक सत्ता झाला आहे.  याच धर्तीवर भारतीय अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती, मार्गदर्शक शक्ती कोणती आणि त्यांचा भारताच्या वाटचालीत काय योगदान काय याचा विस्तृत विचार करण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.  भारत हे देखील ची...

सहकार से समृद्धी: सहकार क्षेत्राची राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप

विना सहकार नहीं उद्धार, असा नारा देत उभी राहिलेली सहकार चळवळ अनेक चढ-उतारांमधून प्रवास करत इथवर पोचली आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स (एशिया पॅसिफिक) च्या आकडेवारीनुसार भारतात ८,५४,३५५ सहकारी संस्था आहेत, २९.०६ कोटी इतकी सदस्यसंख्या आहे. भारतात पतपुरवठा करणाऱ्या आणि न करणाऱ्या अशा ढोबळ वर्गीकरणात सहकारी संस्था आहेत. पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था ते बहुराज्य सहकारी बँका असा विस्तार आहे. पतपुरवठा न करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये सहकारी गृहरचना संस्था, डेअरी, ग्राहक भांडार, अनुसूचित जाती/जमाती, महिला विकास संस्था इत्यादींचा समावेश आहे. भारतात १७ सहकारी फेडरेशन, ३९० राज्य स्तरीय सहकारी फेडरेशन, २७०५ जिल्हास्तरीय सहकारी फेडरेशन आणि १४३५ बहुराज्य सहकारी संस्था आहेत. भारतातील सहकार क्षेत्र 'सहकार से समृद्धी' हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. ही झेप घेण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे विविध योजना आखत आहेत. त्या योजनांची व्याप्ती आणि भविष्यातील आवाका लक्षात येण्याच्या दृष्टीने वरील आकडेवारीचा आढावा घेतला आहे.  जुलै २०२१ मध्य...

आत्मनिर्भर भारत: सेमीकंडक्टर क्षेत्र

संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा भारताचा साधारण स्वभाव आहे. हे संधीत रूपांतर निरनिराळ्या कारणांनी, प्रेरणेने होत आले आहे. काही वेळा स्वयंप्रेरणा तर काही वेळा मिळालेला दट्ट्या. पण वस्तुस्थिती आहे की संधीचे सोनेच झाले आहे, किंबहुना भारतीयांनी केले आहे. ऐतिहासिक कालखंडात असंख्य उदाहरणे आहेत, पण स्वातंत्र्योत्तर भारतातील काही ठळक उदाहरणांचा थोडक्यात आढावा घेऊन भारताने नुकत्याच आलेल्या 'आपदा' चे 'अवसर' मध्ये कसे रूपांतर केले आणि भविष्याचा वेध घेतला याचा विचार करु.  वर्ष १९६५ ते १९७५ हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रचंड उलथापालथ करणारे दशक आहे. भारताने भयानक दुष्काळ अनुवभवले, पंतप्रधानांनी एक वेळचे जेवण सोडण्याचे आवाहन केले होते. पण त्याच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी भारतातील हरित क्रांतीचा पाया रचला. आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. दुसरे उदाहरण १९९१ चे. भारताची आर्थिक स्थिती रसातळाला पोचली होती. त्यावेळी मिळणाऱ्या कर्जाच्या (तांत्रिक भाषेत बेल आउट) बदल्यात भारताने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारावे अशा अटी होत्या. वास्तविक औद्योगिक क्षेत्र खासगी ...

दिल्ली: अविस्मरणीय अनुभवांचं गाठोडं

Image
केंद्रीय सत्तेचे स्थान: नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक  "जीवन में एक बार आना लखनऊ" अशी एक उक्ती आहे. त्यात थोडासा बदल करुन असे म्हणावे वाटते की जीवन में एक बार आना दिल्ली. दिल्ली, आधुनिक भारताची राजधानी. वास्तविक या शहराची ओळख एवढीच नाही. दिल्ली हे भारताचं एक सत्ताकेंद्र थेट महाभारत काळापासून आहे. इंद्रप्रस्थ ते नवी दिल्ली हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. दिल्लीच्या इतिहासाच्या, ऐतिहासिकतेच्या खुणा जागोजागी दिसतात. तसेच दिल्लीचा आधुनिक दिमाखही अचंबित करणारा आहे. दिल्लीत पहिल्यांदा गेलो तेव्हा अगदीच चार वर्षांचा होतो, त्या आठवणी अगदीच पुसट आहेत. यावेळी मात्र चांगलाच तळ ठोकला होता.  त्याला कारण दिल्लीत उच्चपदावर कार्यरत असलेला माझा आतेभाऊ अभिषेक दादा! त्याचा आग्रह आणि माझी ओढ यांचा संगम होत मी चांगला १५ दिवस तळ ठोकून होतो. नवी दिल्लीतील लोधी कॉलोनी या प्रतिष्ठित भागात असणारे त्याचे घर भरपूर चालणाऱ्या गप्पांचे स्थान होते. तो वयाने चांगलाच मोठा असल्यामुळे उपयुक्त जीवनावश्यक सल्ले, उपदेशही मिळाले. शिवाय त्याच्यामुळे कधी नव्हे ते मी फुटबॉल विश्वचषकातील अनेक सामने पाहिले. इतके की अंतिम...

सह अस्तित्वाचे प्रश्न:

Image
सह अस्तित्वासाठी मुस्लिम समाजाकडून हिंदूंच्या अपेक्षा  भारत हा विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रवाहांचा गोपाळकाला आहे. एक चावून चोथा झालेलं वाक्य वापरायचे तर अनेक धर्म, सांस्कृतिक परंपरा इथे गुण्यागोविंदाने राहतात. खरेच राहतात? राहत असल्या असत्या तर 'सह अस्तित्वाचे प्रश्न' आपल्याला विचारावे लागले असते का?  भारत प्राचीन काळापासून कायमच सांस्कृतिक अखंडता असणारे, विविध राज्यांत, राज्यपद्धतीत नांदणारे राष्ट्र राहिले आहे. भारतीय विचारात आसेतुहिमाचल राजकीय प्रभुत्वाची, सार्वभौमत्वाची चक्रवर्ती ही संकल्पना आहे. प्राचीन काळापासून भारताने अनेक आक्रमणे झेलली. त्यातली बहुतांश पचवली. आक्रमक भारतीय विचारात, संस्कृतीत एकरूप झाले, मिसळून गेले. आक्रमकांना पचवून, त्यांना आपलंसं करुन सह अस्तित्वाचा एक आदर्श उभा करणारी ही संस्कृती मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीला आलेल्या, एका धार्मिक आक्रमणाने इतकी कोलमडली कशी? इतकी कोलमडली की त्यामुळे सह अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचे एक कारण निश्चितच भारतीय वैचारिक जगतात आलेले एक औदासिन्य, आत्ममग्नता आणि वाढती सामाजिक विषमता हे आहेच. ते नाका...

रुपयाचा प्रश्न

Image
वाढता डॉलर की घसरता रुपया: एका किचकट प्रश्नाचा मागोवा  फोटो सौजन्य: गुगल  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, "रुपयाची किंमत घसरत नाहीए, तर डॉलर अधिकाधिक बळकट होत आहे." असे विधान केले. त्यावर विरोधकांकडून अर्थमंत्र्यांची अक्कल काढणारे, त्यांच्यावर स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी करण्यात आलेले असत्य, गोलमोल विधान अशी टीका केली जाईल. पण अर्थशास्त्रीयदृष्ट्या विचार करता लक्षात घेतले पाहिजे की हे विधान काळजीपूर्वक, सर्व समजून-उमजून केलेले आहे. ते कसे हे समजून घेण्यासाठी मुळातून एखाद्या देशाचे चलन, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमत, होणारे बदल याचे गणित, शास्त्र समजून घ्यावे लागेल. हा विषय किचकट आहे, क्लिष्ट आहे. पण रोमांचकारी आहे. सध्या उलगडत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व मुद्दा उलगडायचा असल्यामुळे चलन म्हणजे काय या मूलभूत मुद्द्यापासून सुरु न करता, थेट चलन विनिमय, आणि त्याचे दर याचा विचार करु.  चलन आणि विनिमय:  चलन विनिमय दर म्हणजे, एका चलनाची दुसऱ्या चालनाच्या तुलनेत होऊ शकणारी किंमत होय. ही किंमत ठरवण्याचे दोन मार्ग. एक, निश्चित दर आणि दुसरा...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

Image
एक प्रसिद्ध वचन आहे, "some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.." म्हणजे, काही जन्मतःच महान असतात. तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोचतात. तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते असे आपण म्हणतो कारण महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून. याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की ते जन्मताच महान होते.  भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण याच भारताची दुसरी ...