दोन दिवसांपूर्वी सर्वत्र बातमी झळकली की 'अमेरिकेतील खनिज तेलाच्या किंमती उणे 37 डॉलर प्रति बॅरल पर्यंत उतरल्या आहेत' आणि भारतात तत्काळ प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली. यात "आता पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरून घेईन आणि त्यांनाच पेट्रोल भरल्याचे पैसे मागेन" असल्या मिम पासून ते एका जबाबदार, हुशार, संयुक्त राष्ट्रांत मुत्सद्दी म्हणून काम केलेल्या खासदाराने 'मग भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अजूनही कमी का नाही' असा प्रश्न ट्विटर वर उपस्थित करेपर्यंत अनेक प्रतिक्रियांचा भडीमार झाला. सोशल मीडियावरील मिम्स एकवेळ बाजूला ठेवुयात. ते मुख्यतः मनोरंजनासाठीच असतात पण एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेत दीर्घकाळ कार्य केलेल्या विद्यमान खासदाराने असे बेजबाबदार ट्विट करावे याला खरं तर काही अर्थ नव्हता, नाही. ते खासदार विरोधी पक्षाचे असले, त्यांना सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा, प्रश्न उपस्थित करण्याचा पूर्ण हक्क आहे, हे मान्य. पण त्याला काहीएक अर्थ असावा की नको? असो, तर मुद्दा असा की अमेरिकेत खनिज तेलाचे भाव 'उणे' झाले. म्हणजे नक्की काय झालं हे
या ठिकाणी राजकारण, अर्थकारण, समाजकारण, इतिहास झालंच तर कधी कधी भूगोल यासोबतच पुस्तक परिचय, चित्रपट समीक्षण इत्यादी प्रकार आहेत. भाषेचे फारसे बंधन नाही. म्हणजे गरज आणि साधनांची उपलब्धता यानुसार मराठी आणि इंग्रजी मध्ये लिखाण. या कट्ट्यावर...!!