Posts

कोरोना, लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा आणि बँका

Image
               दुसऱ्या महायुद्धानंतर जगात फार कमी वेळा अशा आल्या जेव्हा जगभरात एक अनिश्चितता आली होती. मानवजातीचे वर्तमान आणि भविष्य काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातल्या बहुतेक वेळा युद्धाचे सावट होते किंवा १९७३ सालचे क्रूड ऑइल संकट होते. महागाईचा भडका सर्वत्र उडाला होता. अशा प्रसंगी इतर उत्पादन आणि सेवा ठप्प पडण्याच्या मार्गावर आल्या तरी अत्यावश्यक सेवांची गरज पडतेच. त्यांचे उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम झाला तर त्याची परिणती एका अराजकाकडे होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सध्याचे चीननिर्मित जागतिक संकट आणि त्याचा जागतिक व्यवहारांवर झालेला परिणाम खूप महत्वाचा आहे. चीनमध्ये सुरुवात झालेलं कोरोना व्हायरस किंवा कोविद १९ किंवा अगदीच थेट उल्लेख करायचा तर चायनीज वूहान व्हायरस हे एक प्रचंड मोठे संकट म्हणून उभे ठाकले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारे वेळीच सावध झाली. चीनमधून जेव्हा प्राथमिक बातम्या आल्या तेव्हा केंद्र सरकारने वूहान मधून भारतीय विद्यार्थी आणि इतरांना भारतात आणण्याची व्यवस्...

Yojana: Budget Special

योजना शौनक कुलकर्णी - इझ ऑफ लिव्हिंग हे २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे प्रमुख लक्ष्य. - २०१९-२० च्या आर्थिक पाहणी अहवालात १३० कोटी लोकांच्या, लोकांसाठीच्या संपत्ती निर्माण क्षमतेवर भर. - अर्थसंकल्प तीन प्रमुख मुद्द्याभोवती- ऍस्पिरेशनल इंडिया : कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, उद्योग, व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा यातून लक्ष्य 'न्यू इकॉनॉमी' केरींग सोसायटी : अंत्योदय या आधारावर तीन प्रमुख घटकांचा विचार, महिला व बालविकास, सामाजिक कल्याण, पर्यटन व सांस्कृतिक, पर्यावरण - सरकारचे लक्ष्य : डिजिटल गव्हर्नन्स, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन द्वारे पायाभूत सुविधा उभारणी, पेन्शन आणि विमा क्षेत्राच्या वाढीद्वारे सामाजिक सुरक्षा डॉ राजीव कुमार, उपाध्यक्ष नीती आयोग - २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध. - कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी १६ पॉईंट ऍक्शन प्लॅन; जो सर्व घटकांना स्पर्श करतो. - कृषी उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्प...

V. P. Menon: The Unsung Architect of Modern India

Image
The turbulent years of 1947-48. Modern Indian State was born at the cost of partition. Partition that caused mass displacement of millions of people. Partition that caused genocides, mass rapes.  Modern Indian State was born as a result of the long freedom struggle where number of freedom fighters sacrificed their lives for the sake of independence of the nation. On one hand there was freedom struggle all over the country while on the other other hand there was British Indian government.  We sing the ballads of freedom movement quite often and quite right so but, there was a man inside the government machinery who was monitoring the changing political dynamics from close quarters. He was instrumental in bringing mammoth like changes in not just political discourse but the trajectory of the freedom struggle also.  With initial plans for an independent India in tatters, a desperate viceroy, Lord Mountbatten, turned to his senior most Indian civil servant V. P. Men...

सवाई एकांकीकोत्सव

Image
सवाई एकांकीकोत्सव  महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रात एकांकिका स्पर्धांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पुणे, मुंबईत आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या नाट्य-चित्रपट सृष्टीसाठी कलाकारांची, तंत्रज्ञांची खाण ठरतात. ही कलाकारांची खाण आता मुंबई-पुण्याच्या पट्ट्याबाहेर वाढू लागली आहे. राज्य नाट्य स्पर्धा, अहमदनगर महाकरंडक, कोकणात पेण, बार्शी, औरंगाबाद, मध्यंतरीच्या काळात सकाळ करंडक आणि आता लोकसत्ता लोकांकिका ही विविध व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण या सर्व चुरशीच्या स्पर्धा प्राथमिक ठराव्यात अशी एकांकिका स्पर्धा आहे ती 'चतुरंग सवाई' एकांकिका स्पर्धा. या स्पर्धेचे स्वरूपच आहे ते 'उत्तमातील सर्वोत्तम निवडण्याची स्पर्धा' असे. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका साठी असणारा 'जयराम हर्डीकर करंडक' विजेती एकांकिका इत्यादी संघाना सवाई एकांकिका स्पर्धेत प्रवेश मिळतो. त्यानुसार चालू वर्षात सवाई एकांकिका स्पर्धेत राज्यभरातील उत्तम अशा एकांकिका त्यातील सात 'सवाई' च्या अंतिम फेरीत होत्या...

गोब्राह्मणप्रतिपालक: Why Brahmins are on Target?

Image
            "Thank god, Maharashtra did not go by the 'Bhakti Marg' of Ramdas, otherwise 'Peshwai' would have arrived much earlier than actual.." This is one of the common comments one may come across while reading about comparative analysis of poet saints Tukaram and Ramdas in relation with Shivaji and establishment of the Maratha empire.  While reading the comment, it may not seem to be anti Brahman or something, because there is no such direct mention of the Brahman as caste. The word 'Peshwai' denotes it. Here, Peshwai is to emphasize on dominance of Brahmans over other castes.  The divide between Savarna- Dalit, Dalit and other castes is prevalent all over India. But in southern India in general and Maharashtra in particular a venomous feeling is prevalent against Brahmans. In fact, On one hand it has a history of 'Vedokta' issue with regard to Rajarshi Shahu Maharaj, ब्राह्मणेतर (Anti Brahman) movement. Maharashtra has a par...

अर्थसंकल्प २०२०-२१

अर्थसंकल्प २०२०-२१ भारतीय अर्थव्यवस्था एका बिकट परिस्थितीतून जात असताना २१व्या शतकातील तिसऱ्या दशकासाठी महत्वपूर्ण ठरेल असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प चार प्रमुख मुद्द्यांवर बेतला आहे. 'ऍस्पिरेशनल इंडिया, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर ऑल, केरींग सोसायटी आणि इझ ऑफ लिव्हिन्ग' या चार मुद्द्यांभोवती सर्व तरतुदी आणि योजनांची मांडणी करण्यात आली आहे. या प्रत्येक मुद्द्यात इतर अनेक उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थसंकलप मांडत असताना तामिळ संतकवी, काश्मिरी कवी यांच्या रचना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ऐकवल्या. त्याद्वारे संपत्ती निर्माण, सामाजिक संरक्षण इत्यादींची मांडणी करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी, योजना पुढीलप्रमाणे. भारतीय अर्थव्यस्था: भारत जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था.  २०१४-१९ या पाच वर्षात सरासरी वाढीचा दर ७.४ टक्के. महागाईचा दर सरासरी ४.५ टक्के.  २००६-१६ या कालावधीत २७१ दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर.  २०१४-१९ या काळात भारतात एकूण २८४ अब्ज ड...

आर्य: चाणक्याच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी

Image
आर्य  - वसंत पटवर्धन  प्रजासुखे सुखं राज्ञ:। प्रजनांच हिते हितम। नात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां तु प्रियं हितम।। तस्मात नित्योतथीतो राजा कुर्यादर्थानुशासनम  अर्थस्य मुलमुत्थानम अनर्थस्य विपर्यय:  अनुथाने ध्रुवोनाशः                  या श्लोकात आर्य चाणक्याने राज्यकारभार आणि आदर्श राजाने कोणती तत्वे पाळत राज्यकारभार करावा याचे सार वर्णन केले आहे. राज्यकारभार, दुर्गव्यवहार, अर्थव्यवहार, गुप्तहेर यंत्रणा, युद्ध कल्पना, दंडनीती अशा अनेक राज्यव्यवहार संबंधी प्रश्नांवर अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शनपर ग्रंथ आर्य चाणक्याने सिद्ध केला आहे. तो ग्रंथ, त्यातील सूचना आजही उपयोगात आणल्या जातात. राज्यव्यवहारासोबतच कंपनी व्यवस्थापनासकट अनेक क्षेत्रात चाणक्याचा हा ग्रंथ २५०० वर्षांनंतरही उपयुक्त ठरत आहे. युरोपीय इतिहासात अत्यंत तर्ककठोर, व्यवहारी असा विचार मांडणारा विचारवंत आहे तो मॅकिआव्हेली. पण तुलनाच करायची झाली तर निःसंशय चाणक्य कित्येक योजने पुढे आहे असे जाणवते. तो सर्वसामावेशक ग्रंथ म्हणजेच अर्थशास्त्र आणि त्य...