Skip to main content

Posts

Showing posts from 2019

Gentlemen Spymaster

Gentlemen Spymaster Rameshwar Nath Kao - Nitin Gokhale               They operate in disguise. Their successes do not award them special recognition. Their successes do not find a word in newspapers-media but their failures do. Most of the times their success stories find front page reporting in enemy countries. They are eyes and ears for the security of the country. Yes, they are the spies, operatives in intelligence agencies. India does have her own external intelligence agency. It has been operating worldwide for the security, stability and protecting national interests of India.  Indian administrative and security set up has legacy of colonial rule. The steel frame that British set up still continues with little modifications. Armed forces take pride in quoting their regimental establishment in British times.  Indian Police that later on tuned into Indian Police Service has its roots in British establishments so does the intelligence apparatus. Intelligence Bureau an

Panipat: The Great Betrayal

पानिपत  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमदशाह अब्दाली आण

Sri Lanka: Maj. Gen. Shashikant Pitre

श्रीलंकेची संघर्षगाथा: मेजर जनरल शशिकांत पित्रे  नु कत्याच श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्ष यांचे बंधू गोतबाया राजपक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. पण माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा यांचे बंधू एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. २००५-१५ या काळात ते श्रीलंकेचे संरक्षण सचिव होते. श्रीलंकेतील रक्तपाती आणि अमानुष यादवी युद्ध संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २००९ मध्ये प्रभाकरनचा मृत्यू झाल्यानंतर यादवी युद्ध, विप्लववाद कमी झालेला असला आणि तमिळ नागरिकांना श्रीलंकेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. १९७० च्या दशकाची अखेर ते २००९ असा प्रदीर्घ काळ विविध तमिळ ईलमवादी गट आणि श्रीलंका लष्कर असा लढा चालला. त्यात भारतीय उपखंडातील एक महत्वपूर्ण शक्ती म्हणून भारताचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे. भारताच्या सामरिक, आर्थिक स्थिरतेसाठी श्रीलंका आणि हिंद महासागर यातील भारताचे प्रभुत्व गरजेचे आहे. चीनचा एक आर्थिक आणि लष्करी सत्ता म्हणून उदय झाल्यानंतर हिंद महासागरात वावर वाढला आहे. 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' या चीन

फर्जंद ते फत्तेशिकस्त

फर्जंद ते फत्तेशिकस्त  शिवाजी, भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक राजा. यादव, विजयनगर या साम्राज्यांच्या पाडावानंतर एक अहोम राज्य वगळता सर्वत्र मुसलमानी राजवट कायम झाली होती. एतद्देशीय मराठा, राजपूत आणि इतर सर्व सरदार घराणी तालेवार होती, मातब्बर होती पण त्यांच्या आपापसात लढाया होत असत. एकमेकांच्या लग्नाच्या वऱ्हाडांवर हल्ले केले जात असत. एकमेकांत वैर असले तरी चाकरी मात्र इमाने इतबारे बादशहाची करत असत. या सर्वात स्वातंत्र्याकांक्षी एक घराणे आले ज्यांनी इतिहासाचे पाट बदलले. शहाजी राजांनी स्वराज्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. पण पुढे जात बंगळुरू, तंजावर येथे जवळ जवळ स्वायत्त असे राज्य उभारले. इकडे महाराष्ट्रात मात्र शिवाजी राजांनी मावळातल्या सामान्य माणसांना एकत्र करत, त्यांच्यातून नवे सरदार घडवत एक स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य रयतेचे राज्य होते. ते स्वराज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा या भावनेतून उभारणी झाली होती. या स्वराज्यस्थापनेचा अचाट पराक्रम पाहून गागाभट्टांसारख्या प्रकांड पंडिताने राज्याभिषेकाची कल्पना मांडली आणि ती तडीस नेली. त्यासाठी एक नवा ग्रंथ शिवराज्याभिषे

The JNU Conundrum

जेएनयू: दुसऱ्या नवनिर्माणाचे स्वप्नाळू आंदोलन?               वि द्यार्थी.. या नावात, संकल्पनेतच एक ऊर्जा आहे. प्रश्न विचारणारी, बंडखोरी करणारी ऊर्जा आहे. पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धती शैक्षणिक परिप्रेक्ष्यात प्रश्न विचारण्याला, बंडखोरीला उत्तेजन  देणारी आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत गहन विषय गुरू-शिष्यांमधील प्रश्नोत्तरांतूनच उलगडत गेले आहेत. काळ पुढे सरकत गेला तसं विद्यार्थ्यांमधील बंडखोरीच्या कक्षा विस्तारल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच अधिक व्यापक राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थीप्रणित आंदोलने जगभर झाली. काही यशस्वी, काही अयशस्वी तर काही नव्या व्यवस्थेला जन्म देणाऱ्या चळवळी जन्माला आल्या. असंच मजेची गोष्ट सांगायची तर अफगाणिस्तानात धार्मिक, दहशतवादी उत्पात माजवणाऱ्या संघटनेच्या नावाचा अर्थ विद्यार्थी असाच आहे. ती संघटना म्हणजे तालिबान. अर्थात त्यांच्या 'विद्येच्या' आणि विद्यार्थ्यांच्या कल्पना खूपच वेगळ्या आहेत. भारतात देखील विद्यार्थी चळवळींचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक विद्यार्थी संघटना स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होत्या. स्वातंत्र्याच्या पूर

Veerappan: Chasing the Brigand by K. Vijay Kumar

वीरप्पन: क्रूरकर्म्याचा थरारक माग  तामिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे तत्कालीन प्रमुख के. विजय कुमार यांची विजयी गाथा     १४ हजार चौरस किलोमीटरचे कर्नाटक, तामिळनाडू केरळ राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील डोंगराळ, घनदाट जंगलांचा प्रदेश. एकीकडे उटी हे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण, तेथील चहाचे मळे दुसरीकडे मदुमलाई, बांदीपूर चे जंगल तर एम एम डोंगर, कावेरी नदीचं खोरं असा प्रचंड प्रदेश. चहा, उत्कृष्ट प्रतीचे चंदन, ग्रॅनाईट खडकांच्या खाणी आणि हस्तिदंत याचा अवैध व्यापार, शिकार यामुळे अस्वस्थ असणारा प्रदेश. त्यातच आपली अंगभूत हुशारी, अखंड सावध, संशयी आणि जवळ जवळ अखेरच्या क्षणापर्यंत असलेली नशिबाची साथ या जोरावर एक क्रूरकर्मा त्या भागात निर्माण झाला. चंदन तस्करी, हत्तीची शिकार यातून झालेली सुरुवात अपरिहार्यपणे वन खात्याशी  संपर्क आणणारी ठरते. तिथे एक तर संगनमत किंवा संघर्ष अशा दोन शक्यता संभवतात. इथे संघर्ष उभा राहिला. अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या अटकेतून विलक्षण चतुराईने करून घेतलेली सुटका यामुळे स्थानिक आदिवासी आणि गावांमध्ये एक रॉबिनहूड सारखी प्रतिमा तयार झाली. ती प्रतिमा अंगभूत हुशार

Political Games: Maharashtra chapter

Political Games Maharashtra Chapter P olitics is an art. Ideally it has to be a tool to make people's lives better through governing policies. In practice it's a game. A brutal game where power does not remain a tool, it becomes the goal. A brutal game where as per Frank Underwood 'Generosity is its own form of power.' Tussle for top position, tussle for becoming an influential figure and tussle to remain consistent and relevant is inevitable in this game. One who masters in tactics and timings play a long inning. There are many such figures in India who not just remained relevant in constantly changing political scenarios but also turned out to be pioneers of precedents. India being 'Union of states' has many layers of politics. Indian voters have always been mature enough to vote keeping in mind what institution they are voting for. One such election recently happened where politics turned out to be brutal game. A game where one cannot decide or come t

जोकर

जोकर अस्वस्थ करणारा सिनेमा   माझ्याशिवाय तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. मी आहे म्हणून तुझे महत्व आहे... ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'द डार्क नाईट राईसेज' चित्रपटातील जोकर हे खलनायकी पात्र नायक, सुपरहिरो बॅटमॅन ला म्हणतो. हे खरेच आहे. चित्रपट असो कि सामान्य जीवन खलनायकाच्या खलत्वावर नायकाचे नायकत्व अवलंबून असते. चित्रपट, कथा, कादंबऱ्यांत आपल्या समोर उभा केला जातो तो नायक. त्याची बाजू. त्याची नायक होण्याकडची वाटचाल. पण त्यातील खलनायकाची देखील एक बाजू असते. त्याची देखील काही कहाणी असते. ती विचारात घेणे आवश्यक वाटू लागते. त्या खलनायकाच्या नकारात्मक बाजूचे उदात्तीकरण योग्य नाहीच. पण बाजू समजून घेणे आवश्यक आहे. जगभरच्या चित्रपटांमध्ये अनेक वेळा अँटी हिरो ह्या संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. त्यात अमेरिकेतील माफिया जगतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट गॉडफादरचा उल्लेख अपरिहार्य आहे. भारतीय चित्रपट परिप्रेक्ष्यात देखील अनेक अँटी हिरो संकल्पनेवर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. रोमान्स चा बादशहा म्हणवला जाणारा शाहरुख खान पुढे आला तो अँटी हिरो टाईपच्या भूमिकांमधूनच. ही झाली

अमिताभ..

अमिताभ .. अभिनय असावा तर त्याच्यासारखा, सभा - संमेलनात वावर असावा तर त्याच्यासारखा, भाषेवर प्रभुत्व असावं तर त्यांच्यासारखं, व्यावसायिकता असावी तर त्यांच्यासारखी, वय सहसरचंद्र दर्शनाकडे जात असताना तरुणांना लाजावणारी ऊर्जा असावी तर त्यांच्यासारखी, वागण्या - बोलण्यात सुसंस्कृतपणा असावा तर त्याच्यासारखा. आणखी किती आणि काय गुण सांगावेत त्यांच्यातले जे अंगीकारले तर माणूस आपापल्या क्षेत्रात यशस्वी होईल, मानद होईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध धाटणीचे चित्रपट, जाहिरात, दूरचित्रवाणी कार्यक्रम अशा क्षेत्रांत उत्तुंग काम केलेल्या, महनीय अशा महानायकला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा मुक्तिंग्राम ही पार्श्वभूमी असणाऱ्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातील अन्वर पासून ते अलीकडेच गाजलेल्या पिंक पर्यंत आपल्या अभिनयाने, भरदार आवाजाने महानायक झालेल्या अमिताभ बच्चन यांच्याविषयी अनेक माध्यमात अनेक वेळा बोललं गेलं आहे. त्यांच्या कारकीर्दीचा उहापोह अनेक वेळा करण्यात आलेला आहे. आता पुन्हा करण्यात काय हशील असा प्रश्न पडू शकतो. पण कितीही वेळा चर्चा केली तरी क

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती

सेक्शन 375 : मर्जी या जबरदस्ती   ‘जस्टिस इज अ‍ॅबस्ट्रॅक्ट बट द लॉ इज फॅक्ट’ असा विचार करण्यास भाग पाडणार्‍या संवादाने चित्रपटाची सुरुवात होते. हा संवाद पुढे येतो तो मुंबईतील नामांकित वकील तरुण सलुजा (अक्षय खन्ना) एका विधी महाविद्यालयात व्याख्यान देत असताना चित्रपटाच्या साधारण सुरुवातीलाच असा प्रश्नार्थक संवाद देऊन, चित्रपट मूळ कथानकाकडे वळतो. या चित्रपटाची कथा भारतीय दंडविधानाच्या कलम 375 आणि 376 च्या भोवती गुंफलेली आहे. पार्श्वभूमी आहे ती नुकत्याच झालेल्या ‘मि टू’ चळवळीची. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट) आपल्या घरी आलेल्या कॉस्चूम विभागात काम करणार्‍या मुलीवर बलात्कार करतो. मुलगी पोलीसात तक्रार दाखल करते. दिग्दर्शकाला अटक होते. हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे प्रकरण माध्यमांमध्ये खूप चर्चेत येते. मीडिया, सोशल मीडियाच्या न्यायालयात दिग्दर्शकाला दोषी करार दिला जातो. सोशल मीडियावर हँग द रेपिस्ट वगैरे हॅशटॅग फिरतो. स्थानिक सत्र न्यायालयात दाखल झालेली तक्रार, वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक तपासणीनंतर मिळालेले पुरावे यांच्या आधारावर 10 वर्षे सक्